( Prahar Artcile) आदिम , आदिवासी जमातीची संस्कृती कला म्हणजे अनमोल असा ठेवा आहे. भारतीयांना अभिमान वाटावा अशा काही कला आहेत ; पण त्याचे जतन , संवर्धन याबाबत फार मोठा प्रश्न उभा आहे. परंतु पिंगुळी गावातील आदिवासी ठाकर समाजाची चित्रकथी ही कला जाणीवपूर्वक जोपासण्याचे कार्य गेली कित्येक र्वष परशुराम गंगावणे करीत आहेत आणि तोच वारसा त्यांचे चिरंजीव चेतन गंगावणे पुढे नेत आहेत. रामायण , महाभारतातील पौराणिक कथांवर आधारलेली चित्रे दिव्यासमोर आणून संवादानुसार ती पात्रे चक्क बोलू लागतात. आजच्या थ्रीडी चित्रांप्रमाणे चित्रकथेचे चित्रपट जणू साकार होते. दोन-अडीच हजार लोकसंख्या असलेल्या पिंगुळी गावात सुमारे १०० घरे आहेत. राधा नृत्य , पोतराज , गोंधळ , चित्रकथी , पोवाडा , स्त्रियांचे पारंपरिक खेळ यासारखे अकरा लोककला प्रकार पूर्वीपासून चालत आले आहेत. पूर्वी काष्ठ शिल्पे , बाहुल्या आदी विशिष्ट कलेची निर्मिती केली जायची ; परंतु परशुराम गंगावणे यांनी सुमारे अडीचशे चित्रे जतन केली आहेत. म्हणूनच सरकारने दखल घेत दक्षिण- मध्य सांस्कृतिक समितीवर त्यांची नियुक्ती केली. त्या माध्यमातून देशभरातील ...