एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना, त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटी ते भीमा (किंवा चंद्रभागा) नदीतिराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना 'गोपाळपूर' येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. पण तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात! विठ्ठल म्हणजे असा जो विटेवर उभा आहे. आम्ही भक्त पुंडलिक व देव विठ्ठल यांची विठेची कथा पारंपारीक लोककला चित्रकथी च्या माध्यमातुन दाखविलेले आहेत. हे चित्र भारतातील एका संग्रहालयाला आम्ही तयार करुन दिलेले आहे. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर|| आषाढी एकादशीच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा Artist- Mr. Eknath Parshuram Gangavane
For more details Chetan Parshuram Gangavane
Thakar Adivasi Kala Aangan Museum & Art Gallery
9987653909,9403804631
www.pingulichitrakathiart.com
https://www.facebook.com/kalaaanganartgallery/
https://www.facebook.com/sundartouristhomestay/
Sindhudurg First Tribal Puppetry and Chitrakathi Painting Museum
Save Tribal Culture
#culturaltourism #art #tribal #craft #pingulichitrakathi #cmomaharashtra #tourism #museum #sindhudurg #mtdc #pmoindia #artist #painting #puppetry #indianart #culture #tourist #gallery #adivasi #puppet #shadowpuppet #chitrakathi #pinguli #community #awareness #theatre #folk #india #atmanirbharbharat #atmanirbhar #vitthal #pandarpur
Comments
Post a Comment